प्रिय राज,

तुझे उत्तर भारतियाँ विशयिचे उद्गार ऐकले, फारच छान वाटले, तू म्हणतो त्या प्रमाणे त्यांनी मराठी संस्कृति शिकलीच पाहिजे, मी काय इथे येउन अमेरिके चे राष्ट्र गान फुकटात नाही शिकलो , बुश म्हणाला , इथ राहायचे असेल तर अमेरिकन व्हावा लागेल, मला बर्गर खायला लावले, माझ्या इंग्रजी वर हसला (त्याची स्वताहाची कशिही असो), मला भारताचे कोणते ही 'डे' सोडून ४ जुलाई साजरा करण्याचे आदेश दिले आहेत - अरे तोही तुझ्या सारखा 'स्वाभिमानी' माणूस आहे ना । भारतीय आमची सगळी कामं घेत आहेत असे म्हणून इथले लोक रोज आपलीच दुकानं फोडतात आणि निदर्शन, बंद वगेरे करूं आपली 'शक्ति' दाखवतात । कुठले ही अपराध झाले रे झाले कि ते 'बाहेरच्यान्नी' केले आणि आमचे नाव बदनाम करतायेत असे बोलतात .
अरे महाराष्ट्रा पुढे अमिताभ काय आहे ? तुझ्या म्ह्न्ट्ल्या प्रमाणे ज़र त्याने मुम्बइतुन निवडणुक लढ्वली असती तर तो किमान जिंकला ही असता , आणि गोविंदा सारखे तारे ही लावले असते ज़मीन पर ! पण बाक़ी काहीही असो, एक असे की मला नाही वाटत मराठी मुलांना असे सान्गायचे आवडेल कि " मी इयत्ता चौथी - , ऐश्वर्या राय शाळेत आहे "। दुसरे असे की महाराष्ट्र ते कही बाराशे एकहात्त्रावे प्रोडक्ट नव्हे अमिताभ्ने प्रमोट करण्यासाठी ।
असो , तरीही इतर कारणांनी तू आपली मुहीम चालुच ठेव, 'प्रतीक्शा' वर फोडण्या साठी ज़र बाटल्या कमी पडल्या तर मी इथून कोक आणि पेप्सी पाठवतो ।

वि वि
- तुझ्यासारखाच एक 'स्वाभिमानी' महाराष्ट्रियन
-------------------
नाव आहे म.न.से , मस्ती करतो तनसे !

Comments

Popular Posts